जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एमआयडीसीतील केमिकल आणि फार्मासिटिकल कंपनीमध्ये येणाऱ्या कच्चा मालाची नि:ष्पक्षपणे चौकशी करून दोषी आढळल्यास कंपनीचा परवाना रद्द करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्या गायत्री सोनवणे यांनी गुरूवार ७ एप्रिल रोजी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे.
गायत्री सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगावातील एमआयडीसी भागात असलेल्या समृद्धी केमिकल्स, संपत्ती इंडस्ट्रीज आणि सुबोनिया केमिकल्स फार्मासिटिकल कंपनीमध्ये येणाऱ्या कच्च्या मालाची चौकशी करावी. या तीनही कंपन्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अन्न व खाद्य प्रशासन, प्रदूषण विभाग व इतर कार्यालय विभागात योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करण्यात आले आहे का ?, तसचे ‘सो टेस्टी’ नावाचा मसाला बाजारात विक्री चालू आहे. संबंधित मसाल्यात चव वाढविण्यासाठी आयएनएस-365 हा घटक समाविष्ट करण्यात आलेला आहे. संबंधित घटक हा कशापासून तयार झालेला आहे. याची सरकारी व खासगी प्रयोगशाळा मार्फत चौकशी करण्यात यावी. संबंधित कंपन्यांमध्ये कच्चामाल कुठून येतो, सदरची प्रक्रिया केलेला कच्चामाल हा कोण कोणत्या प्राण्यांच्या मासांपासून तयार होतो. याची सखोल चौकशी करावी. चौकशीत दोषी आढळून आलेल्या कंपनीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या गायत्री सोनवणे यांनी गुरुवार ७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी फिरोज पिंजारी, फरीद शेख, वर्षा लोहार, फिरोज शेख, पुष्कर बोयर आदींनी सहभाग नोंदविला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1016091309337752