केंद्र सरकार विरोधात कॉंग्रेससह मित्र पक्षांचे भारत बंदचे आवाहन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | केंद्राने लागू केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्या विरोधात सोमवार २७ सप्टेंबर रोजी कॉंग्रेस पक्ष व मित्र पक्षांतर्फे भारत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

याप्रसंगी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब पवार,प्रदेश सचिव डी. जी. भाऊसाहेब, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष रवी योगेंद्र पाटील, महानगराध्यक्ष शाम तायडे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जनरल सेक्रेटरी जमील शेख उपस्थित होते.

 

प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी  पुढे म्हणाले की,  देशातील जनतेचा आक्रोश समाजासमोर यावा यासाठी  भारत बंदची हाक सर्वपक्षांनी एकत्र येवून दिली आहे.  कायद्यांची मोडतोड करून देशात हुकुमशाही आणण्याचा कट मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. याला तोंड फोडणे आवश्यक असल्याने भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

 

दिल्ली येथे ११ महिन्यापासून शेतकरी काळे कायदे रद्द करण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत.या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी भारत बंदचे आंदोलन करण्यात येत आहे.  कॉंग्रेस काळात उभारण्यात आलेल्या  सत्ता संपत्ती  मोदी सरकारला उभारता आलेले नाही. उलट ते विक्रीचे धोरण अवलंबले आहे असा आरोप कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी मोदी सत्तेवर आल्यापासून देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. दिवसेंदिवस महागाईत वाढ होत आहे. बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे ? या सर्व गोष्टींच्या विरोधात सर्व सामान्य जनतेने उद्याच्या बंद मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/207823121414997

 

Protected Content