पुणे (वृत्तसंस्था) केंद्र सरकारची अवस्था दारुड्यासारखी झाली आहे. दारु मिळाली नाही तर दारुड्या जसा घरातील वस्तू विकतो त्याप्रमाणे हे सरकार भारत पेट्रोलियम कंपनी विकायला निघाले आहे, अशा शब्दात मोदी सरकारवर टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काल पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी 24 जानेवारीच्या महाराष्ट्र बंदला 35 संघटनांचा पाठिंबा आहे, असे आंबेडकर म्हणाले.