जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता आज तीन सदस्यीय केंद्रीय समिती आज दाखल झाली आहे. त्यांनी शहरातील काही प्रतिबंधित व शासकीय वैद्यकीय महाविलयास भेट देऊन कोविड सेंटरची पाहणी केली.
केंद्रीय समितीत केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार, डॉ. अरविंद विश्वाह, डॉ. बॅनर्जी यांचा समावेश आहे. या पथकाने एमआयडीसी परिसरातील कौतिक नगर, शिवाजी नगर येथील प्रतिबंधित क्षेत्रास भेट दिली. त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, इन्सीडेंट अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, अधिष्ठाता जयप्रकाश रामांनद आदी उपस्थित होते. प्रतिबंधित क्षेत्रास भेट दिल्यानंतर पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन कोरोना कक्षाची पाहणी करून अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्यात.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2880871615474183/