जळगाव, प्रतिनिधी । केंद्रीय पथकाकडून जळगाव जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा बैठक झाली. यात मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले.
केंद्रीय पथकाच्या बैठकीला खासदार रक्षा खडसे ,जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खा.रक्षा खडसे यांनी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना केलेल्या मागणीनुसार वरिष्ठ प्रादेशिक संचालक आरोग्य व कुटुंब कल्याण पुणेचे डॉ.अरविंद अलोने व सल्लागार सार्वजनिक आरोग्य डॉ.एस.डी. खापर्डे या दोन अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. कोरोनाच्या गंभीर प्रश्नांवर अजून कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, हा आजार हद्दपार करण्यासाठी पुणे व मुंबई येथील जाणकार डॉक्टर्स येथे थांबतील आणि निरीक्षण करणार आहेत.