जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य विक्री व वैदयकीय प्रतिनिधी संघटना जळगाव शाखेच्या वतीने केंद्राने कामगार कायद्यात केलेले बदल मागे घ्यावेत, औषधांवरील जीएसटी शून्य टक्के करणे या व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत अखिल भारतीय संघटनेच्या (FMRAI) आदेशाने एक दिवशीय संपात सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र राज्य विक्री व वैदयकीय प्रतिनिधी संघटनेच्या १६ मागण्यांअसून त्यापैकी ६ मागण्या केंद्र सरकारकडे वैद्यकीय प्रतिनिधी कामगार व सर्वसामान्य जनतेच्या आहेत तर ३ मागण्या राज्य सरकारकडे आहेत. यात मुख्यता कामगार कायद्याची अंमलबजावणी करणे, मालक वर्गाकडे सेलच्या नावावर वैदयकीय प्रतिनिधीची पिळवणूक थांबवणे, वेतन व भत्ते कपात करणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून वैद्यकीय प्रतिनिधींवर पाळत ठेवणे व त्या माध्यमांचा वापर करून मानसिक छळवणूक करणे थांबवणे. तसेच केंद्र सरकारने कामगार कायद्यातील केलेले बदल मागे घेण्यासाठी व औषधांवरील जीएसटी 0%करणे, औषधांच्या किमती कमी करणे यासारख्या इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्वक निदर्शने करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विक्री व वैदयकीय प्रतिनिधी संघटना जळगाव शाखेचे जिल्ह्यातील सर्व ६५० सभासद हे अखिल भारतीय संघटनेच्या (FMRAI) पुकारलेल्या एक दिवशीय संपात सहभागी झाले आहेत. या निदर्शनाचे नेतृत्व कॉम नरेंद्र सिंह, रितेश शहा, संदीप पाटील, अमोल कुलकर्णी, सागर घटक तसेच संप यशस्वी करण्यासाठी कॉम. चेतन पाटील, चंपालाल पाटील, मनीष चौधरी, राजेश पोद्दार, श्याम पाटील, वैभव शिरोळे, रवींद्र अहलुवालिया,अजहर शेख, महेश चौधरी, दिनेश शिंपी, विजय चौधरी व विशाल चौधरी यांनी कामकाज पहिले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1213394529068866