जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट परिसरात प्लॉस्टीक कॅरीबॅग विक्रेत्यांवर महापालिकेच्या पथकाने सकाळी धडक कारवाई करत प्लास्टिक कॅरीबॅगांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागरी घनकचरा व्यवस्थापण नियम २००० या कायद्याने प्लास्टिक पिशव्यांची आयात, पुरवठा व विक्री करण्यास शासनाने बंदी घातली आहे. या अनुषंगाने जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी १३ मे रोजी प्लॉस्टिक कॅरीबॅग विक्रेत्यांवर धडक कारवाईला सुरूवात करण्यात आली. शहरातील फुले मार्केट परिसरातील तीन प्लास्टिक कॅरीबॅग विक्रेत्यांच्या दुकानावर छापा टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच या कारवाईची धास्ती घेत विक्रेते व नागरिकही सजग झाले आहेत. ही कारवाई महापालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील यांच्यासह पथकाने केली आहे.
दरम्यान प्लास्टिक पिशव्यांची आयात, विक्री व पुरवठा केल्यास कमीतकमी ५ हजार व जास्तीतजास्त १० हजार रुपयांचा दंड केला जातो. प्लास्टिक पिशाव्यामधून वस्तू विकल्यास कमीतकमी ५० व जास्तीतजास्त ५०० रुपयांचा दंड केला जातो. प्लास्टिक पिशव्यांचा कचऱ्यात समावेश केल्यास कमीतकमी १० तर जास्तीत जास्त १०० रुपये दंड केला जातो. अशी माहिती उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.