जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील लाभाथ्र्यांसाठी कृषी विभागाच्या योजनांच्या लाभ व कृषी गटाबाबत 21 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.00 वा. एकदिवशीय मार्गदर्शन शिबीरचे आयोजन केले आहे. अशी माहिती योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
या शिबीरात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव हे कृषी विषयक योजनांचे व कृषी गट तयार करणेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरास जास्तीत जास्त संख्येने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन श्री. पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.