कृषी दिनानिमित्त चिंचपुरे येथे वृक्षारोपण उत्साहात

पाचोरा, प्रतिनिधी ।   पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे येथे कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेत कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेतर्फे कृषी साप्ताहनिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. 

 

चिंचपुरा येथील जिल्हा परिषद शाळेत कृषी दिनाचे औचित्य साधून रविवार ४ जुलै रोजी  कृषी पदवीधर संघटना पाचोराच्या वतीने  वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आलेल्या मान्यवरांचा शाल, फुलगुच्छ व सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पाचोरा सामाजिक वनीकरण विभागाचे वानखेडे तसेच पाचोरा कृषि विभागाचे कृषी सहाय्यक संतोष चव्हाण, बांबरुड (राणीचे) ता. पाचोरा येथील युवा कुषी पदवीधर युवा शक्ती संघटना  पाचोरा तालुका कार्याअध्यक्ष व आदर्श शेतकरी व प्रयोगशिल शेतकरी मयूर वाघ, सरपंच हुसेन तडवी, कृषी पदवीधर संघटनेचे पाचोरा तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच शिवश्री सचिन कोकाटे पाटील, ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील, आबा पाटील,  गणेश पवार, पंकज पाटील, गोपाळ पाटील, गणेश पाटील सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content