नवी दिल्ली वृत्तसंस्था । कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसने आपला पवित्रा अजून आक्रमक केला असून जोवर हे कायदे रद्द होत नाही तोवर लढा देण्याची घोषणा राहूल गांधी यांनी केली आहे.
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांना पाठिंबा दर्शवत आणि केंद्राच्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरत नायब राज्यपाल यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, भाजप सरकारला हे कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. जोपर्यंत हे कायदे रद्द होणार नाहीत, तोपर्यंत काँग्रेस मागे हटणार नाही. केंद्राने तयार केलेले कायदे हे शेतकर्याच्या विकासासाठी नाहीत, तर त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आहेत, असा आरोप राहूल गांधी यांनी मोदी सरकरावर केला आहे.
राहूल गांधी पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही भूमी अधिग्रहण कायद्याच्या माध्यमातून शेतकर्यांची जमीन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी काँग्रेसने त्यांना रोखलेले होते. आता पुन्हा भाजपा आणि त्यांच्या मित्रांनी शेतकर्यांना टार्गेट केले आहे, त्यातूनच भाजपाने कृषी कायद आणलेले आहे.