कृषी औद्योगिक विकास महामंडळ सदस्यपदी पाटील

पाचोरा प्रतिनिधी । माजी आमदार आर.ओ. पाटील यांची महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जळगाव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख आर.ओ.पाटील यांची महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार किशोर पाटील नगराध्यक्ष संजय गोहिल उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्योगपती मुकुंद बिल्दीकर, जि.प. सदस्य पदमसिंग पाटील, रवी केशव आणि व शिवसेनेचे पदाधिकारी, युवा पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. निर्मल सीडसचे अधिकारी व कर्मचारी तसेच समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.

Add Comment

Protected Content