जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यात सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महाबळ येथील “सामाजिक न्याय भवना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, पशुधन विकास अधिकारी डॉ.निलेश बारी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, सहाय्यक लेखाधिकारी मनिषा पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, शेती करतांना आधुनिक पद्धतीचा वापर करावा, एकच पिक न घेता बहुपिक पद्धतीने पिकांची लागवड करावी असे आवाहन उपस्थितांना केले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना कृषी विभाग राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजना बाबत सविस्तर माहिती दिली. शुधन विकास अधिकारी डॉ.निलेश बारी यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड आवश्यक असून पशुसंवर्धन विभागाच्या दुधाळ जनावरे, शेळी गट वाटप योजना बाबत माहिती दिली. तर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात समाज कल्याण विभाग राबवित असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेची संकल्पना स्पष्ट केली व सदर योजनांमुळे लाभार्थ्यांना उत्पन्नाचे शाश्वत स्त्रोत उपलब्ध झाल्याचे नमूद केले. तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी तर आभार राजेंद्र कांबळे, कार्यालय अधिक्षक यांनी मांडले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व कार्यालयीन तालुका समन्वयक यांनी विशेष प्रयत्न केले.
चौकटीत –
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यास सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील आहे.
– श्री. योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव.