बोदवड, प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोप माहितीच्या अधिकारी कार्यकर्ता सुरेश नारायण कोळी यांनी केला आहे.
याबाबत अधिक असे की, बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील माहिती अधिकार कार्यकर्ता सुरेश नारायण कोळी यांनी मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दिनांक ३ एप्रिल २०२१ रोजी यांच्याकडे माहिती अधिकार अर्जमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची माहिती मागितली होती. त्या अर्जाच्या अनुषंगाने दिनांक ३०/०८/२०२१ रोजी पत्रक काढण्यात आले होते. सदर कार्यालयातमध्ये मागितलेली माहितीही विस्तृत स्वरुपाची माहिती असल्याने माहिती अधिकार अधिनियमनुसार अवलोकनासाठी दिनांक ०७/०८/२०२१व दि.०८/०९/२०२१ किंवा दि.०९/०८/२०२१ अशा तीन पैकी एक तारखेला माहिती व लोकांसाठी कार्यालयात हजर राहावे यासाठी पत्र दिले होते. परंतु, संबंधित कार्यालयाला कोणत्या तारखेला जावे हेच कळेनासे झाले. महिन्याचा व दिनांक यांचा उल्लेख चुकीचा असल्याकारणाने माहिती अधिकार कार्यकर्ता सुरेश कोळी ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जन माहिती अधिकारी तथा कृषी अधिकारी मुक्ताईनगर यांनी केल्याचा आरोप अर्जदार कोळी यांनी सांगितले