रावेर, प्रतिनिधी | साप्ताहिक कृषीसेवकतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कारार्थींची निवड यादी येत्या २७ डिसेंबरला जाहीर होणार आहे. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्काराचे सन्मानित करण्यात येते.
दरवर्षी राज्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्कार वितरण व गौरव सोहळ्याचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन व शासनाच्या नियमांचा आदर राखत तसेच तांत्रिक कारणामुळे हा पुरस्कार वितरण सोहळा नाईलाजाने काही काळ पुढे ढकलावा लागला होता. दरम्यान, या सोहळ्याचे आयोजन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले असून साप्ताहिक कृषीसेवकतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारार्थ्यांच्या नावाची यादी सोमवारी दि. २७ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी विविध गटातून निवड झालेल्या पुरस्कारार्थिंच्या नावाची यादी साप्ताहिक कृषीसेवक मधून २७ डिसेंबरच्या अंकात प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच निवड झालेल्या पुरकररार्थीना वैयक्तिकरीत्या निवड पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे. यासाठी खालील नंबरवर (मो. ९४०४२४३५१५) संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.