अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ना. गुलाबराव पाटील यांचे अमळनेर शहरात आगमन होताच राजभवन येथे त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.
आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ना. गुलाबराव पाटील यांचा ताफा अमळनेर शहरात दाखल झाला. येथे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी भर पावसात ना. पाटील यांचे स्वागत केले. याप्रसंगी २५ महिलांनी मंत्री महोदयांचे औक्षण केले. तर, साहेबराव पाटील यांनी कृषी संस्कृतीचे प्रतिक म्हणून केळीचा घड हा ना. पाटील यांना भेट म्हणून दिला. याच ठिकाणी त्यांना हनुमान चालीसा, साने गुरूजी यांची प्रतिमा आणि पुस्तकांचा सेट देखील भेट म्हणून देण्यात आले. तर, सोबत त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, सुंदरपट्टीचे सरपंच सुरेश पाटील, स्वप्ना विक्रांत पाटील, माजी नगरसेवक भूतबापू पाटील, प्रताप शिंपी, गोपाळ पाटील, चोपडाई सरपंच संभाजी पाटील, पाडळसरे सरपंच सचिन पाटील, शेतकी संघाचे महेश देशमुख, विजय पारख, हितेंद्र जैन, विकी जाधव, विशाल जाधव आदींसह अमळनेरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.