Home धर्म-समाज ‘कृषिधन’ भव्य कृषी प्रदर्शनानिमित्त ‘मिलेट मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन

‘कृषिधन’ भव्य कृषी प्रदर्शनानिमित्त ‘मिलेट मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरात सातपुडा विकास मंडळ संचलित पाल येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आणि आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कृषिधन’ भव्य कृषीप्रदर्शनानिमित्त एक धाव शेतकऱ्यांसाठी या उपक्रमांतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.

आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिप्रदर्शनानिमित्त एक धाव शेतकऱ्यांसाठी या उपक्रमा अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरील स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकास अनुक्रमे 1111/- प्रथम बक्षीस, 751/- व्दितीय बक्षीस, 551/- तृतीय बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे नोंदणी शुल्क नाही. पुढे दिलेल्या लिंक वर जाऊन नोंदणी करावी https://forms.gle/GXPLQ6CkN5EEgKWQ9 असे अव्हान संस्थेचे सचिव अजित पाटील यांनी केले.

मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी पुरूषांसाठी 5 किलोमीटर आणि महिलांसाठी 3 किलोमीटर अंतराची असणार आहे. स्पर्धा दुपारी 2:15 वाजता सुरूवात होणार आहे. परिसरातील जास्तीत नागरिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा. स्पर्धेत नाव नोंदविण्यासाठी डाॅ. गोविंद मारतळे, शारीरिक शिक्षण संचालक, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्याशी 9637105757 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन आयोजकांकडून करण्याचे आले आहे. ही स्पर्धा फैजपूरशहरातील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेज शेजारील मैदान आयोजीत करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound