Home Cities जळगाव कुसुंबा शिवारात बैलाची कत्तल करून मांस, कातडीसह शिंगे उघड्यावर फेकणाऱ्यास अटक

कुसुंबा शिवारात बैलाची कत्तल करून मांस, कातडीसह शिंगे उघड्यावर फेकणाऱ्यास अटक


जळगाव प्रतिनिधी । कुसुंबा शिवारात एका पत्राच्या शेडमध्ये बैलाची कत्तल करून त्याची कातडी, मासांचे तुकडे व शिंगे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

कुरेशी इकबाल शेख गफुर (वय-४८) रा. इस्लामपुरा भवानी पेठ असे संशयित आरोपीचे नाव आहे. २३ मे रोजी कुसुंबा शिवारात एका पत्राच्या शेडमध्ये अज्ञात व्यक्तीने बैलाची कत्तल करून त्याच्या मांसाचे तुकडे कातडी व शिंग उघड्यावर फेकून दिली होती. कुसुंबा शिवारात दुर्गंधी सुटल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या पाहणीत हा प्रकार समोर आला होता. नागरिकांच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांनी पाहणी करून स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तपासात भवानीपेठेतील कुरेशी याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी २ जून रोजी अटक केली.


Protected Content

Play sound