कुसुंबा येथील बंद घरात चोरी

जळगाव प्रतिनिधी । कुसूंबा येथील सदगुरुनगरातील कमलेश सातपुते कुटूंबीयांसह इंदूर येथे गेले असतांना अज्ञात चोरट्याने रोकडसह दागिने लंपास केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, कमलेश रविंद्र सातपुते(वय-३१) कुसूंबा येथील सदगुरु नगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्याचे बंधु इंदूर येथे स्थायिक असून संपुर्ण कुटूंबीय शनिवार (ता.७) रोजी घर बंद करुन इंदौर येथे गेले होते. मंगवार (ता.१७) रोजी सातपुते कुटूंबीय सदगुरु नगरातील घरी परतले. घरी आल्यावर मुख्य दाराचा कडीकोयंडा तूटलेल्या अवस्थेत आढळून आला. आत गेल्यावर घरीातील साहीत्य अस्ताव्यस्थ फेकून लोखंडी कपाट तोडण्यात येवुन रोकडसह दागिने चोरट्यांनी लंपास केले. सातपुते यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या दहा दिवसांपासुन कमलेश सातपुते आणि कुटूंबीय बाहेर गावी गेले होते. काल कसुुंबा येथे नळाला पाणी आल्यानंतर शेजारी पंडीत शुक्ला, दामु पाटिल यांनी सातपुते यांच्या कंपाऊंड मधील नळाला मोटारलावून दुपारी पाणी भरले. तेव्हा घराचा दरवाजा व्यवस्थीत कुलूप बंद होता. रात्रीतून चोरट्यांनी घरफोडी केल्याचे शेजार्‍यांनी सांगीतले. दरम्यान, चोरट्यांनी सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी; २० ग्रॅम सोन्याची पोत; १० ग्रॅम रुपये किंमतीच्या २ अंगठ्या आणि २७ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Protected Content