Home क्राईम कुलरचे दुकान फोडून मुद्देमाल लांबविला

कुलरचे दुकान फोडून मुद्देमाल लांबविला


जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे दुकान फोडून कुलर आणि गॅस हंडी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात शुक्रवार १४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाल भागवत ढवळे (वय-२९) रा. आयोध्या नगर जळगाव यांचे कुसुंबा शिवारात हॉटेल शिवशाही हॉटेलजवळ कुलर फॅक्टरीचे दुकान आहे. या ठिकाणी शुक्रवार १४ एप्रिल रोजी रात्री १२ ते सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कुलरचे दुकान फोडून ४ कुलर आणि गॅस अंडी असा एकूण १५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.  या संदर्भात शुक्रवार १४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound