मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हा येथील पानटपरीधारकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना रविवारी उघडकीला आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरेधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अनंता रमेश महाजन (वय-४०) रा. कुऱ्हा ता.मुक्ताईनगर जि. जळगाव हे शेती काम करतात. शेती व पानटपरी व्यवसायही करतात. शेती व पानटपरीसाठीच्या कामासाठी त्यांच्या २२ हजार रूपये किंमतीची दुचाकी (दुचाकी क्रमांक माहित नाही) आहे. १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी आपली दुचाकी पानटपरीच्या मागे लावली होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते पानटपरीचे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. १३ डिसेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून दुचाकी चोरी प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.