Home Cities पाचोरा कुऱ्हाड खु” माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण

कुऱ्हाड खु” माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण

0
39


 

पाचोरा, प्रतिनिधी ।पाचोरा  तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, आदर्श माध्यमिक विद्यालय कुऱ्हाड खु”येथे  ७५ वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

 

शालेय समितीचे चेअरमन सतिष चौधरी यांच्या उपस्थितीत सरपंच संगिता भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी कैलास भगत, शंकर बोरसे, अरूण पाटील, संतोष चौधरी,  ग्रामपंचायत व विकास सोसायटीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक भास्कर बोरूडे, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

शालेय समितीचे चेअरमन सतिष चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून  सन – २०२० – २१ मध्ये  झालेल्या एस. एस. सी.  परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या प्रथम ५ विद्यार्थीनींचा सत्कार  करीत रोख पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगी शालेय आवारात आॅक्सिजन  देणा-या वृक्षांची (वड, पिंपळ, निंब) लागवड करण्यात आली. सुत्रसंचालन सुहास मोरे यांनी केले.

 


Protected Content

Play sound