नवी दिल्ली वृत्तसंस्था । सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्या पाकला भारतीय जवानांनी धडा शिकवत त्यांचे पाच सैनिक ठार केले असून अनेक बंकर उद्ध्वस्त केले आहेत.
सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रीसंधीचे वारंवार उल्लंघन होत होते. पाकच्या या कारवायांना आज भारतीय लष्कराने चांगलेच प्रत्युत्तर दिले. पुंछ आणि राजौरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पाच रेंजर्संना कंठस्नान घातले. यासोबतच पाकचे १२ बंकर्सही उद्धवस्त केले आहेत, याबाबत लष्करी कारवाईचे अधिकारी रणबीर सिंग यांनी माहिती दिली. तसेच पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास इंडियन आर्मी नेहमीच तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, भारतीय सैन्याची ही कारवाई अतिशय महत्वाची मानली जात असून यामुळे पाकचे मनोधैर्य खालावणार असल्याचे सामरिक तज्ज्ञांचे मत आहे.