पाचोरा, प्रतिनिधी ! तालुक्यातील कुरंगी येथील एकाने वडीलांच्या तर दुसर्यांने आजोबांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांना दिलेल्या पानाच्या टँकरचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
राम नवमीच्या पावनपर्वावर २१ एप्रिल रोजी दुपारी श्रीराम जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर गावातील कै. भिवसन सोनजी पाटील यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्र्वर भिवसन पाटील व कै. नंदा दलपत पाटील.यांच्या स्मरणार्थ योगेश शांताराम पाटील यांच्या कडून ५ हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर कुरंगी नागरिकांना ह. भ. प . कैलास महाराज व ह. भ. प. गोविंद महाराज यांच्यासह महिला भजनी मंडळाकडून पुजन करून लोकार्पण करण्यात आले.
लोकांच्या नेहमीच सुखदुःखात लागणा-या पाण्याचे टँकर लोकार्पण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गणेश पाटील, योगेश ठाकरे, ज्ञानेश्र्वर पाटील, दिनकर सोनवणे, पंढरीनाथ पाटील, अविनाश कोळी, गणेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.