कुणीही मोर्चे, आंदोलने करू नये ; इंदुरीकर महाराजांकडून चाहत्यांना शांततेचे आवाहन

indurikar maharaj

 

संगमनेर (वृत्तसंस्था) मुलगा-मुलगीच्या जन्माबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वादात अडकलेल्या कीर्तकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांनी आपल्यासाठी कुणीही मोर्चे, आंदोलने करू नये, असे आवाहन एका पत्रकाद्वारे केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ चाहते आंदोलनं करण्याची तयारी असल्याच्या पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांनी पत्रक काढले आहे.

 

इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन, समर्थकांना आंदोलन न करण्याचं आवाहन केले आहे. या पत्रकात इंदोरीकर महाराजा म्हणतात, चलो नगर म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. आपण सगळे माझ्यावर प्रेम करणारी भक्त मंडळी आहात. वारकरी संप्रदाय हा शांतताप्रिय आहे. तरी आपणा नम्र विनंती करण्यात येत आहे की, आपण कोणीही, कुठेही, रॅली, मोर्चा, एकत्र जमने, आंदोलन करणे, निवेदन देणे असे काहीही करण्याचा प्रयत्न करु नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहोत. तरी आपण सर्वांनी शांतता राखून सहकार्य करावे ही विनंती, अशी विनंती त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

दरम्यान, समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असे वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. या सर्व वादानंतरही इंदोरीकर महाराज आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. आपण चुकीचे बोललो नसून, विविध ग्रंथांचा संदर्भ दिला, असे ते म्हणाले.

Protected Content