Home क्राईम कुंभारी बुद्रुक येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कुंभारी बुद्रुक येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
34
death

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कुंभारी बुद्रुक येथे ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घरातच घराची कडी आतून बंद करून गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्घटना आज सायंकाळी घडली.

जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक येथील रहिवासी गजानन समाधान भिसे ( जोशी ) या ३२ वर्षीय तरुणाने सायंकाळी सहाच्या सुमारास घराचा दरवाजा आतून बंद करून छताला दोरखंड बांधून गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी घटनास्थळी दाखल झाले.

या संदर्भात श्रीराम गुलाब गदई यांच्या खबरी वरून पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहेत.


Protected Content

Play sound