Home क्राईम कुंभमेळ्यात घातपात करण्याचा होता कट

कुंभमेळ्यात घातपात करण्याचा होता कट

0
35

मुंबई प्रतिनिधी । इसीसशी संबंध असल्याने अटक करण्यात आलेल्यांचा कुंभमेळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी नदीच्या पाण्यात केमिकल मिसळून मोठा घातपात घडवण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आली आहे.

याबाबत वृत्तांत असा की, कालच एटीएसने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून ९ जणांना अटक केली आहे. हे सर्वजण इसीस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते आणि सगळ्यांचा मोठा घातपात घडवण्याचा कट होता. दरम्यान, त्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी हायड्रोजन पेरॉक्साइड, अ‍ॅसिडचे मिश्रण अन्नपदार्थ आणि पाण्यात मिसळून त्यामाध्यमातून हाहाकार उडवून द्यायचा, कट आखली होता अशी माहिती एटीएसला मिळाली आहे. याशिवाय, या कटामध्ये अंडरवर्ल्डचा हात असण्याची प्राथमिक माहितीदेखील समोर आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound