किशोर पाटील कुंझरकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करा

 

जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा निर्दय व निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्राथमिक शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या मृत्यूप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. कुंझरकर हे अतिशय विनयशील नम्र स्वभावाचे असताना तसेच सामाजिक चळवळीत तसेच प्रबोधनाच्या आंदोलनात सातत्याने अग्रभागी राहत असताना त्यांचा खून करण्यात आला आहे. हे आदर्श शिक्षक यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, मराठा महासंघाचे अमोल कोल्हे, श्रीकांत मोरे, भारत सोनवणे, किरण ठाकूर, दिलीप सपकाळे, गणेश गवळी, चंदन बिऱ्हाडे, नाना मगरे, गौतम सोनवणे आदींनी केली आहे.

Protected Content