किरकोळ कारणावरून मुलाकडून आईवडीलांना मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लहान मुलांना का मारतो याचा जाब विचारल्याच्या कारणावरून मुलाने आपल्या आई व वडीलांना मारहाण करून दगड मारला. याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मुलावर याच्यावर पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धामणगाव प्लॉट कानळदा येथे दगडू विठ्ठल सोनवणे (वय-५८) हे पत्नी विमलबाई आणि मुलगा ज्ञानेश्वर यांच्यासह वास्तव्याला आहे. २९ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता गावातील लहान मुलांना ज्ञानेश्वर हा मारत होता. त्यावेळी त्याचे वडील दगडू सोनवणे यांनी “लहान मुलांना का मारतोय” असा विचार ना केलेल्याने ज्ञानेश्वरला राग आला. त्यानी वडील दगडू सोनवणे आणि आई विमलबाई सोनवणे यांना मारहाण करून अंगणात पडलेला दगड त्यांच्यावर फिरवला. यामध्ये त्याचे वडील दगडू सोनवणे यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात वडील दगडू विठ्ठल सोनवणे यांनी गुरूवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा ज्ञानेश्वर दगडू सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशील पाटील करीत आहे.

Protected Content