जळगाव प्रतिनिधी |शहरातील जुनाखेडी रोडवरील ज्ञानदेव नगरात गाडी लावण्याच्या कारणावरून शेजार्यांमध्ये वाद झाला. या वादातून पांडुरंग बाबुराव भिडे रा. ज्ञानदेव नगर यांच्यावर शेजारील बाप-लेकाने विळ्याने हल्ला केल्याची घटना बुधवार दि.७ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शेजारी बाप-लेकाविरुध्द शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, ज्ञानदेव नगरात पांडुरंग बाबुराव भिडे याचे घर आहे. त्यांच्या बाजुला लक्ष्मण गंगाराम काळे यांचे घर असून गाडी लावण्यावरून व लक्ष्या का म्हटला असे या कारणावरून काळे यांनी पांडुरंग बाबुराव भिडे यांच्याशी वाद घातला. या वादातून लक्ष्मण काळे व त्याचा मुलगा युवराज काळे यांनी पांडुरंग भिडे यांना मारहाण केली. याचवेळी लक्ष्मण काळे यांनी भिडे यांच्या नाकाजवळ विळा मारून त्यांना जबर दुखापत केली. पांडुरंग भिडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी पांडुरंग भिडे यांच्या जबाबावरुन शनिपेठ पोलीसात लक्ष्मण गंगाराम काळे, युवराज लक्ष्मण काळे यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. नरेंद्र बागुले करीत आहे.