यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनीधी | तालुक्यातील किनगाव येथील मुकबधीर कन्या तेजश्री पाटील हिने सी.आर. रंगनाथन विद्यालयातुन मिळवली बीएची पदवी श्रीराम मंदीर बिश्वस्तव ग्रामस्थांनी स्वागत सत्कार केले.
यावल तालुक्यातील किनगाव येथिल रहीवासी व सामाजीक कार्येकर्ते रविंन्द्र रामकृष्ण पाटील(रवि टेलर) यांची कंन्या तेजश्री पाटील ही मुकबधीर असुन ती श्री सदगुरू साईबाबा सेवा ट्रस्ट संचलित स्व.सी.आर.रंगनाथन कर्णबधीर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (कला)विश्रांतवाडी,पुणे या विद्यालयातून पदवी (बी.ए.)ची परीक्षा उतीर्ण झाल्याबद्दल तेजश्री व तीच्या आई आणी वडीलांचाही पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार श्रीराम मंदिर ट्रस्ट किनगाव यांनी केला श्रीराम मंदीरात झालेल्या या कार्येक्रमात मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थीत होते.
तेजश्री ही मुकबधीर असुन तीने मिळवलेल्या या पदवीच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे तर आपल्या मुकबधीर मुलीला पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करणारे तिचे वडील रविंन्द्र पाटील(रवि टेलर)व आई छाया पाटील यांचेही सर्वत्र कौतूक होत आहे तर परीसरात असे मुकबधीर मुले असतील त्यांना त्यांच्या पालकांनी शिकवावे व त्यासाठी आपण मार्गदर्शन करू असे यावेळी तेजश्रीचे वडील रवि टेलर यांनी सांगीतले.