किनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावात १८ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण

यावल प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात घरफोड्या व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यापार्श्वभूमीवर किनगाव ग्रामपंचायतीच्यावतीने गावात १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. याचे आज माजी आमदार रमेश चौधरी यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. 

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे घरफोडी व चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. या विषयाची गंभीर दखल घेत किनगाव ग्रामपंचायतीने गावातील महत्वाच्या ठिकाणी व भागात असे एकुण १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. आज शुक्रवार २ जुलै रोजी माजी आमदार रमेश चौधरी यांच्याहस्ते १८ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले.

पोलीस निरीक्षक सुधीर पाटील म्हणाले की, गावातील मुख्यरस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हनुमान मंदीर, जामा मस्जीद त्याचबरोबर चुंचाळे रस्ता या महत्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आल्याने किनगाव यापुढे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने निगराणी राहणार असुन गावाची एकता व सुरक्षा कायम राखण्यासाठी ग्रामपंचायतीचे हे कार्य चांगले असल्याचे सांगितले.

याप्रसंगी सरपंच निर्मला पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील, उपसरपंच लुकमान तडवी, पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र, शेतकरी संघटनेचे कडू पाटील, पोलीस पाटील रेखा नायदे, किनगाव खुर्दचे सरपंच भुषण पाटील, अमिन शेख, अमन मन्यार, साधना चौधरी, मेहमुद तडवी, सफदर तडवी, लतीफ तडवी, माजी सरपंच रामकृष्ण धनगर, माजी सरपंच टीकाराम चौधरी यांच्यासह आदी मान्यवर या कार्यक्रमास प्रामुख्याने उपास्थित होते.

Protected Content