यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातीत किनगाव खु॥ ग्रामपंचायतच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेत खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आले असून पंचायत समितीच्या माध्यमातून याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
या संदर्भात यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की , किनगाव खुर्द तालुका यावल या ग्रामपंचायतच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना , आदीवासी शबरी योजना व रमाई आवास घरकुल योजना राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या भोंगळ व गोंधळलेल्या कारभारामुळे घरकुलचा एका पेक्षा अधिक वेळेस ताभ मिळवणाऱ्या एकाच व्याक्तीच्या नांवावर घरकुल योजनेचा लाभ देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शासनाच्या नियमानुसार एका व्याक्तीस एका जागेवर एकाच वेळेस घरकुलचा लाभ मिळु शकतो, तसा शेरा देखील लाभार्थ्याच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिला जात असतो. मात्र किनगाव खु॥ ग्रामपंचायतीने शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवुन हम करे सो कायदा प्रमाणे खऱ्या लाभार्थ्यांना डावलुन चुकीच्या व बोगस लाभार्थ्यांना घरकुल योजनांचे लाभ देण्याचा सपाटा लावला आहे. या प्रकारामुळे खरे गोरगरीब लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांना शासकीय योजनेपासुन वंचित राहावे लागत आहे. ग्राम पंचायत व पंचायत समितीच्या दुर्लक्षित कारभारामुळे हा प्रसंग ओढवला असून , गटविकास अधिकारी यांनी तात्काळ या सर्व कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सरफराज पिंजारी , रहीम तडवी , रोहीदास पाटील , ज्ञानेश्र्वर तायडे , संजय कोळी ,असलम शाह , सद्दाम खाटीक , विशाल भोई , गोपाळ महाजन, गोकुळ पाटील , विरेन्द्र कोळी, शरद धनगर , चेतन कोळी आणी राहुल भोई यांनी निवेदनाद्वारे केली आहे.