यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव जवळ भरधाव दुचाकी कारवर आदळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी अज्ञात दुचाकीचालकावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुका वैद्यकिय अधिकारी यांचे वाहन क्रमांक (एमएच १९ एम ०६८८) या बोलेरो वाहनाने किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज आटोपुन परत यावलला जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीव्ही ३०२५) ने जोरदार धडक दिली. यात बोलेरो गाडीचे टायर फुटले असून वाहनाचे ६० हजार रूपयांचे नुकसान केले आहे. यात अपघातात वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे व चालक थोडक्यात बाचावले आहे. दोघांना मुक्का मार लागला आहे. ही घटना २३ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीचालकाने अंधाराचा फायदा घेवुन दारूच्या नशेत असल्याने घटनास्थळावरून पसार झाला. या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी बऱ्हाटे यांच्या वाहनावरील चालक कृष्णा सुरेश बिराजदार यांनी खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विकास सुरेश सोनवणे हे करीत आहे.