यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील एका वाहनचालकास कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने त्याची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे.
किनगाव येथे शेतमाल वाहतूक करणार्या वाहनांवर चालक म्हणून काम करणारी गावातील ४५ वर्षीय व्यक्ती तीन दिवसांपासून आजारी होती. शुक्रवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. यानंतर काही वेळात ते बेशुध्द पडले. वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांनी प्रथमोपचार करून त्याला जळगाव येथील कोरोना रुग्णालयात रवाना करण्यात आले. या व्यक्तीचे स्वॅब सँपल घेण्यात आले असून याचा अहवाल लवकरच प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००