काही ठोस सांगायचेच नसेल तर मोदी लाईव्ह येऊन गोंधळ निर्माण करतातच का? : प्रकाश आंबेडकर


मुंबई (वृत्तसंस्था)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीही कठोर किंवा वाईट बातमी देशासमोर द्यायची नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी हे सर्व सोडून दिले आहे. जर पंतप्रधानांना काही ठोस सांगायचेच नसेल तर ते लाईव्ह येऊन गोंधळ निर्माण करतातच का?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.

 

 

सध्या देशात करोनाचं थैमान वाढत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. यावर प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीही कठोर किंवा वाईट बातमी देशासमोर द्यायची नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी हे सर्व सोडून दिले आहे. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा. दरम्यान, आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल”. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचेही मोदी म्हणाले होते

Protected Content