नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काही आठवड्यांमध्ये कोरोनाची लस उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. वैज्ञानिकांशी चर्चा झाली असून देशामध्ये सध्याच्या घडीला आठ लसींची चाचणी सुरु असल्याची माहिती मोदींनी दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मोदींनी देशातील परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच लसीसंदर्भातील महत्वाची माहिती.दिली मोदींनी काही दिवसांपूर्वीच देशामध्ये लसनिर्मीत करणाऱ्या कंपन्यांना भेट दिल्याचा संदर्भ देत लस कधी उपलब्ध होणार, ती सर्वात आधी कोणाला दिली जाणार यासंदर्भातील माहिती दिली.
मोदींनी यावेळी लसीकरणादरम्यान देशवासियांकडून त्यांना काय अपेक्षा आहेत यासंदर्भातही महत्वाचं आवाहन केलं आहे. एकीकडे लस निर्मिती सुरु असली तरी बेसावध राहणं परवडणारं नाही असं मतही मोदींनी व्यक्त केलं आहे. देशामध्ये आठ लसींवर काम सुरु असून त्यापैकी तीन भारतीय असल्याचेही मोदी म्हणालेत.
. त्याचप्रमाणे वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दिल्यास लसीकरणाला देशात सुरुवात केली जाईल असं आश्वासन मोदींनी दिलं. एवढ्या मोठ्याप्रमाणात लसीकरण होतं तेव्हा अनेक अफवा उठतात. या अफवा जनहीत आणि देशहीताच्या विरोधात असतात. सर्वांना मी आवाहन करतो की लोकांना या लसींसंदर्भात जागृक करा आणि ते कोणत्याही अफवांना बळी पडणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.
लसीकरणाच्या वेळी आजारी आणि वृद्धांना प्राधान्य दिलं जाईल. त्याचप्रमाणे फ्रण्ट लाइनवर काम करणाऱ्यांना म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर अत्यवश्यक सेवेतील व्यक्तींना लस देताना प्राधान्य दिलं जाईल असं मोदींनी स्पष्ट केलं आहे. सर्व राजकीय पक्षांनी आणि देशातील नागरिकांनी या लसीकरणासंदर्भात सहकार्य करावं असंही मोदींनी यावेेळी म्हटलं आहे.
राज्यांबरोबर झालेल्या चर्चेमधून अनेक महत्वाचे सल्ले मिळाल्याचेही मोदींनी सांगितलं आहे. काही आठवड्यांमध्ये लस उपलब्ध होईल असे स्पष्ट संकेत मोदींनी आपल्या भाषणामध्ये दिले आहेत.
भविष्यात हा आलेख कसा जाईल हे आत्ताच सांगता येणार. म्हणून आपल्या सर्वांना सावधान राहणं गरजेचे आहे, असंही मोदी म्हणाले.