कासोदा प्रतिनिधी । तालुक्याचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी कासोदा वासीयांना धावती भेट दिली. प्रांताधिकारी आणि पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांनी शहरात कोरोनाविषयी जनजागृती केली.
एरंडोल तालुक्याचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आज धावती भेट घेत गावातील पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव, पीएसआय नरेश ठाकरे, रस्त्यावर उतरून गावात कोरोना विषयी जनजागृती केली. शासन व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. घरात राहण्याबाबत ग्रामस्थांना सूचना दिल्या. त्याप्रसंगी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व यांच्यासह कोरोना दक्षता समितीचे सदस्य यांनी हिरीरीने सहभाग घेतला .