कासोदा, प़तिनिधी । येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात बुधवार( दि. ११ मार्च) रोजी श्री क्षेत्र बासर निमित्त राष्ट्रीय सत्संग मेळावा आयोजित करण्यात आला असून सदर मेळाव्यास परमपूज्य श्री गुरुमाऊली यांचे सुपुत्र आदरनिय श्री चंद्रकांत दादा मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत.
देशातील श्री क्षेत्र बासर हे एकमेव महासरस्वती मातेचे पीठ असुन ते बुध्दी ते विद्यापीठ आहे. त्याबाबत परमपूज्य श्री गुरुमाऊली यांनी” अक्षर अभ्यास”म्हणजे शिक्षणाची दिशा महासत्संगाचे आयोजन केले आहे. कासोदा, एरंडोल, पारोळा, भडगाव परिसरातील समस्त सेवेकरी व भक्तांनी यांचा लाभ घ्यावा. कार्यक्रमापूर्वी दु. १२.वा. श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन आयोजित केले आहे. सदर कार्यक्रमांचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र कासोदातर्फे करण्यात आले आहे.