Home Cities एरंडोल कासोदा येथे ह.भ.प.प्रकाश महाराज यांचे जाहीर कीर्तन

कासोदा येथे ह.भ.प.प्रकाश महाराज यांचे जाहीर कीर्तन


kasoda news 2

कासोदा, प्रतिनिधी | येथील अर्जुन नगर जिल्हा परिषद शाळेजवळ उद्या (दि.२६) रविवार रोजी ह.भ.प. प्रकाश बागुल महाराज तळईकर यांचे जाहीर किर्तन होणार असून सर्व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन एरंडोल बसस्थानक प्रमुख गोविंदा धोंडू बागुल यांनी केले आहे.

 

रात्री ९.०० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज, मनोज महाराज, मृदुंगाचार्य मधुकर महाराज, मनोज महाराज, विणेकरी एकनाथ महाराज, बळीराम महाराज, हार्मोनियम वादक अमृत महाराज, आनंदा महाराज, वाल्मिक महाराज, नाना महाराज, रामकृष्ण महाराज, पंडित देवकर, संजय मराठे व सद्गुरु गोविंद महाराज भजनी मंडळ तळईकर सहकार्य करणार आहेत.


Protected Content

Play sound