कालींका नागरी पतसंस्थेवर अवसायकांची नेमणुक

 

यावल : प्रतिनिधी ।  येथील चेअरमनच्या एकतर्फी कारभारामुळे आर्थिक दिवाळखोरीत  गेलेल्या श्री कालींका नागरी पत संस्थेवर अवसायकांची नेमणुक करण्यात आली आहे

तत्कालीन चेअरमनच्या  भ्रष्ट व्यवहाराच्या गोंधळलेल्या कारभारामुळे दिवाळखोरीत निघालेल्या श्री कालींका नागरी सहकारी  पतसंस्थेचे  कामकाज  अवसायकांकडे सोपविण्यात आले आहे त्यासाठी  काही संचालकांनी  सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर त्यांच्या परिश्रमाला यश आले आहे .

 

श्री कालींका नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०१५ ते २०१७ अखेरच्या ताळेबंदानुसार कर्जदार यांचे व्यवहार उशिराने नोंदविणे वार्षीक सर्वसाधारण सभा व संचालक मंडळ सभा इत्तीवृत्ताबाबत संस्थेच्या नियमितपणे सभा झाल्या किंवा नाही  याबाबत स्पष्टता नसणे ,  संस्थेने कलम १०१ कामी वकील फीपोटी बरीच रक्कम खर्च केली त्याबाबत ताळेबंदामध्ये देणे दर्शवले नाही संस्थेने थकीत कर्जदार यांच्या जंगम मालमत्तेचा लिलाव केला कर्जदाराच्या जप्त केलेल्या वस्तु कर्जदारास परत केल्या किंवा काय याची खात्री करता येत नाही संस्थेने बेकायदेशीररित्या रोखीने रकमा परत केल्या आहेत ; याबाबत सहकारी संस्थांचे ( यावल) उपलेखा परिक्षक डी.  व्ही .  ठाकुर यांनी   २०१७ सालातील    प्रशासकीय अहवाल सादर केला   प्रशासकीय अहवालाच्या अनुषंगाने कलम ८८नुसार प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणुन नेमणुक झाली आहे .

 

या संदर्भात संस्थेचे चेअरमन पंकज सोनार यांच्याकडुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात  १९ मार्च ,२०२१ रोजी चौकशी केली  गेली  रेकॉर्डनुसार चेअरमन पंकज सोनार यांचेकडून पदभार काढुन घेतला आहे  महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ त्यामधील नियम ७२ ( १ ) नुसार ७  जानेवारी २०२० पासुन संस्थेचे अवसायक म्हणुन डी.  एफ.  तडवी यांची नियुक्ती झाली संस्थेस झालेल्या  नुकसानीची जबाबदारी तत्कालीन चेअरमन व संचालक यांचेवर का निश्चित करू नये ? यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ नुसार चौकशी करून  अध्यक्षांसह संचालक  किती रकमेच्या गैरव्यवहारास जबाबदार आहेत याची निश्चिती  करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे   ठेवीदारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा संचालक नितिन  सोनार , देवराम  राणे , टालु महाजन, सैय्यद अखलाक अली यांनी व्यक्त केली आहे .

 

Protected Content