
accident 1191458835
जळगाव प्रतिनिधी | चारचाकीने समोरुन ट्रिपल सीट येणार्या दुचाकीला धडक दिली. मू. जे. महाविद्यालय मार्गे ओंकारेश्वर कडे जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर चारचाकी चालक दुचाकीवरील जखमींना दवाखान्यात उपचारार्थ घेवून जाण्यास तयार असतानाही, जखमींनी इतर मुलांना बोलावून चारचाकीच्या काचा फोडल्याची घटना अग्रवाल चौकात रविवारी सायंकाळी घडली. अपघातानंतर दोघांमध्ये तडजोड होत नसल्याने प्रकरण रामानंदनगर पोलीस ठाण्यात पोहचले होते.याबाबत माहिती अशी की, कानळदा रोडवरील रहिवासी शाम अशोक लंके हे त्यांची चारचाकी (क्र.एम.एच.19.क्यू 3346) ने मू.जे. महाविद्यालयाकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जात होते. याच दरम्यान समोर ट्रीपल सीट दुचाकी आली. या दुचाकीला चारचाकीची धडक बसली. यात दुचाकीस्वारासह तिघे तरुण खाली पडले. यात एकाला दुखातप झाली तर उर्वरीत दोघांना किरकोळ दुखापत झाली. यानंतर दुचाकीस्वारांनी जखमी घेऊन जाण्यावरून कार चालक यांच्यासोबत दवाखान्यात घेवून जाण्यावरुन वाद झाला. लंके हे तिघांना जिल्हा रुग्णालयात घेवून जाण्यास तयार झाले. मात्र तिघांनी खडके हॉस्पिटलमध्ये घेवून जाण्याचा आग्रह धरत पुन्हा वाद घातला.दुचाकीवरील तिघांना खडके यांच्या रुग्णालयात घेवून जाण्यास लंके तयार झाले. यानंतर त्यांनी तिघांना गाडीत बसविले व मार्गस्थ झाले. तोपर्यंत समोर बसलेल्या जखमीने त्याच्या इतर मित्रांना फोनवरुन अग्रवाल चौकात बोलावून घेतले. याठिकाणी उभ्या मुलांनी गाडी थांबविली. यानंतर गाडीतील जखमीही खाली उतरले. व काही कळण्याच्या आत सर्वांनी चारचाकीवर दगडफेक केली. यात गाडीच्या डाव्या बाजूच्या व मागील बाजूंच्या काचा फुटून नुकसान झाले. भितीने लंके थेट चारचाकीसह जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गेले. याठिकाणी त्यांनी पोलिसांना प्रकार कथन केला. पोलिसांनी रामानंद पोलीस ठाण्याची हद्द असून त्याठिकाणी जाण्याचा सल्ला दिला.पुन्हा गाडीची तोडफोड होईल म्हणून लंके यांनी पोलिसांना सोबत येण्याची विनंती केली. त्यानुसार दोन कर्मचारी दुचाकीवरुन त्यांच्या सोबत आले. अशा पध्दतीने लंके यांनी चारचाकी घेवून रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. दगडफेक करणारे जखमी रुग्णालयात तर इतर पसार झाले. काही वेळाने दुचाकीचा मालक जखमीचे मामा रामानंदनगर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी लंके यांना दुचाकीचे नुकसानीचा खर्च झाला असून पैसे देण्याची मागणी केली. तर लंके यांनीही काचा फोडल्याने नुकसान झाले असून खर्च द्यावा, असे सांगितले. दोघांमध्ये रामानंदनगर पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत तडजोड सुरु होती,