रावेर, प्रतिनिधी । आज कार्तिक पौर्णिमानिमित्त महाराष्ट्रा-मध्य प्रदेश सिमेवरील ओंकारेश्वर मंदिर येथे कार्तिक स्वामीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र मंदिर बंद असल्याने भाविकांचा मोठा हिरमोड झाला.
आज कार्तिक पौर्णिमा असून त्यात खास करून कृतिका नक्षत्राची दुपारी १२:४८ ते उद्या सकाळी ६:०३ वाजेपर्यंत आहे. या नक्षत्रात खास महिला दर्शन घेतात. पौर्णिमा आणि कृत्रिका नक्षत्र या वर्षी जुळुन आल्याने मंदिराच्या बाहेर जळगाव, भुसावळ, बु-हानपुर, इंदौर, खरगोन येथून खास दर्शनासाठी भाविक आले होते. परंतु, मंदिर बंद असल्याने भावीकांनी बाहेरुन दर्शन घेतले. यावेळी मध्य प्रदेश इंदौर येथून कार्तिक स्वामीच्या दर्शनासाठी आलेले भावीक महेश शर्मा यांनी लाईव्हशी बोलतांना सांगितले की आज कृतिका नक्षत्रमध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी इंदौर येथून आले आहे, परंतु येथे मंदीर बंद असल्याने माझा व माझ्या परिवाराचा प्रचंड हिरमोड झाला आहे. आमच्या रावेर लाईव्हचे रिपोर्टर यांनी खास कडून ओंकरेश्वर येथील मंदिरातील कार्तिक स्वामीचा आज’चा लाईव्ह फोटो जसाच्या-तसा महिलांसाठी उपलब्ध करून दिला आहे.