जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका महिलेला कारण नसतांना शिवीगाळ करून जिवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवार १ जून रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ५० वर्षीय महिला हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार ३१ मे रोजी साकळी ११ वाजता महिला ही तिच्या सुन सोबत घरी असतांना तांबापुर परिसरात राहणारा साहिल (पूर्ण नाव माहित नाही) हा महिलेच्या घरासमोर येवून काहीही कारण नसतांना साहिल म्हणाला की “माझ्या प्रेमिकाचे नाव का घेता” असे बोलून शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार १ जून रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.