जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भास्कर मार्केटजवळ आपापसात हाणामारी झाल्याचा प्रकार शुक्रवारी ३० जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यात एकाकडून लोखंडी कोयता हस्तगत केला असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावशहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या भास्कर मार्केटच्या कमानीजवळ शुक्रवारी ३० जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास काहीजण कारण नसतांना एकमेकांमध्ये हाणामारी करत होते. ही माहिती जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्या समजली
त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल केतन सुर्यवंशी, पोहेकॉ सलीम तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीसांनी हा प्रकार थांबविला. यातीलएकाकडून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल केतन सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शितल अभिमन्यू शिरसाळे, निर्भय शितल शिरसाळे दोन्ही रा. प्रबुध्द नगर, पिंप्राळा, जळगाव, हरीओम नगर, गौरव हृदयनाथ सोनवणे, तुषार हृदयनाथ सोनवणे दोन्ही रा. आसोदा रोड, जळगाव, दिनेश संतोष सोनवणे रा. निमखेडी रोड, जळगाव आणि तीन १७ वर्षीय अल्पवयीन मुले असे एकुण आठ जणांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सलिम तडवी हे करीत आहे.