मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मंत्रीमंडळाच्या विस्तारावरू प्रहारजनशक्ती पक्षाचे अध्क्ष बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे.
शिंदे सरकारचा दुसरामंत्रीमंडळ विस्तार नेमका केव्हा होणार ? यावरून मोठ्या प्रमाणात संशयकल्लोळ सुरू आहे. अद्यापही याबाबत कोणतेही चिन्ह दिसून येत नसल्याने इच्छुकांमध्ये चलबिचल आहे. यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीसरकारला इशारा दिला आहे. यासंदर्भात टिव्ही नाईन या वाहिनीने वृत्त दिले आहे.
याबाबत बच्चू कडू म्हणाले की, ”आम्हालाही असं वाटतंय की, एकतर विस्तार करु नका. डायरेक्ट सांगून द्या की, विस्तार होत नाही. सगळे शांततेने सरकारसोबत राहतील. ते काय म्हणतात? फुल काढायचं, पुन्हा खिशात ठेवायचं, काय टेक्निकल बाबी असतील ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगाव्यात. या अडचणी आहेत, यामुळे विस्तार होऊ शकत नाही. सगळे ६० आमदार कुणीही काय बोलणार नाही. एकतर करा, नाही होत असेल तर स्पष्ट सांगा. कारण बर्याच आमदारांमध्ये कुजबूज चालू आहे”, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. तर एक घाव दोन तुकड्यांप्रमाणे सर्वकाही स्पष्ट करावे असे देखील ते म्हणाले.