पारोळा प्रतिनिधी । एरंडोल आणि पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कापुस विक्रीच्या नाव नोंदणीला कोणतीही गैरसोय होवू नये, अश्या सुचाना आमदार चिमणराव पाटील यांनी तलाठी यांना दिल्यात. आज तहसील कार्यालयात तालुका आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रांताधिकारी श्री. गोसावी, पारोळा तहसिलदार श्री.गवांदे, एरंडोल तहसिलदार श्रीमती. खेतमाळीस, पारोळा व एरंडोल नायब तहसिलदार, पारोळा व एरंडोल मंडळ अधिकारी, तलाठी, पत्रकार आदी उपस्थित होते.
या बैठकीत आमदारांनी दोन्ही तालुक्यांतील कोरोना काळात प्रशासनाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला व प्रशासनाने केलेल्या कार्याचे कौतुक आमदारांनी केले. तसेच पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीने नुकत्याच सुरू केलेल्या कापुस विक्रीसाठी नाव नोंदणीला एकही शेतकऱ्यांची गैरसोय होवु नये असे आदेश दोन्ही तालुक्यातील तलाठी यांना दिले. तसेच मागील काळात झालेल्या मुसळधार वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांची पिके जमिनदोस्त झाली. त्याबाबतही तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळावी म्हणुन अधिकाऱ्यांना सुचना केल्या. तसेच आमदारांनी पारोळा शहरतलाठी निशिकांत माने यांनी कोरोना भयावह परिस्थितीत केलेल्या कार्याचे शब्दसुमनांनी कौतुक केले.