Home क्राईम कापड दुकान फोडून रोकड लांबविली

कापड दुकान फोडून रोकड लांबविली

0
22

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील बळीराम पेठेतील संत कंवरराम मार्केटमधील न्यू गोवर्धन कलेक्शन कापड दुकान फोडून दुकानातील १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून येण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत सोमवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजा दयालदास पारवाणी (वय-५४, रा. सिंधी कॉलनी, कंवर नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील बळीराम पेठेतील संत कंवरराम मार्केटमध्ये न्यू गोवर्धन कलेक्शन कापड नावाचे दुकान आहे. कापड विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. नेहमीप्रमाणे रविवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करून राजा पारवाणी हे घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कापड दुकानाचे शटर उचकावून दुकानातील गल्लाचे लॉक तोडून १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड चोरून नेण्याचे उघडकीला आले. सोमवारी १९ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे ९.३० वाजता एका चहा टपरीवाल्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने राजा पारवानी यांना फोन करून घटनेची माहिती दिली. पारवाणी हे त्वरीत त्यांच्या दुकानावर आले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound