चोपडा प्रतिनिधी । केंद्र सरकारने जून महिन्यात कांदयाला जीवनावश्यक यादीतून वगळले आणि तीनच महिन्यात कांदा निर्यात बंदी केली. ही निर्यात बंदी त्वरित रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली. त्यामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याचे भाव कोसळले आणि शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांवर घोर अन्याय झाला. त्यासाठी त्वरित कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी काँग्रेसने दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, शेतकरी सेलचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, अॅड. संदेश जैन, विजय पाटील, ज्ञानदेव पाटील, संजीव सोनवणे, अशोक पाटील, ईशतीयाक अली जहागीरदार, मंगेश भोईटे, सूर्यकांत चौधरी, अशोक साळुंखे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. कांदा निर्यात बंदी न ऊठवल्यास कांग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.