Home Cities जळगाव कांताई सभागृहात महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते महिला खेळाडूंचा सत्कार

कांताई सभागृहात महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते महिला खेळाडूंचा सत्कार


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कांताई सभागृह येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मंगळवार ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महिला खेळाडूंचा महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

 

शहरातील कांताई सभागृहात जागतिक महिला दिन  साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अतंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जळगाव विविध क्रीडा संघटनेच्या वतीने मंगळवारी ८ मार्च रोजी घेण्यात आला. यावेळी महापौर जयश्री महाजन, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष फारूख शेख, क्रीडा अधिकारी  मिलिंद दीक्षित, तहसीलदार हंसराज पाटील, तालुका क्रीडा अधिकारी मार्क धर्माई, प्रदीप तांडवलकर, आयुष खोकर यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

 

या कार्यक्रमाला स्वीमींगचे खेळाडू कांचन चौधरी, हॉलीबॉलचे खेळाडू अंजली पाटील, कॅरम खेळाडू आयेशा मोहम्मद, बॉक्सींग खेळात पदक मिळविणारी दिशा पाटील, एनसीसी विद्यार्थींनी मोक्षदा पाटील, एनसीसी विद्यार्थींनी सोनाली पाटील यांच्यासह विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला खेळाडूंचा महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.


Protected Content

Play sound