यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथे राहणारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ माजी आमदार रमेश चौधरी यांची पक्षाच्या राज्य कार्यकारणीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांनी आमदार म्हणुन तिन पंचवार्षिक निवडणुकीत पुर्वीच्या यावल तालुका मतदार संघाचे आमदार म्हणुन नेतृत्व केले असुन त्यांनी पक्षासाठी त्यांचा दांडगा अनुभव आणि त्यांनी एकनिष्ठ म्हणुन केलेले कार्याची दखल घेत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस कमेटीची आज जळगाव येथे काँग्रेस भवनात पक्षाचे जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत जेष्ठ पदाधिकारी म्हणुन रमेश चौधरी यांची राज्य कार्यकारणीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार , माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, हाजी शब्बीर खान, काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, हाजी गफ्फार शाह, आदी पक्षातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.